There was an error in this gadget

Wednesday, December 25, 2013

लीना

ही कविता मी माझी बेस्ट फ्रेंड लीना वरती केली आहे..

कविता केली लीनावरती,
आकाशातील परीभोवती,
प्रुथ्वीवरती अवतरलेल्या,
चंद्राच्या रूपावरती...

अंधाराला जसे किरणाचे महत्व,
अथवा पावसाचे महत्व चातकाला,.
तसेच आहे स्थान मनात माझ्या,
निर्मळ मनाच्या लीनाला...


खूप संकटे झेलते आहे ती अगदी जन्मापासून,
तरी विजयश्री खेचते ती जिद्दीपासून,
मदत करते सर्वाना स्वत:चे दुख विसरून,


आहे थोडे हळव्या मनाची,
आणि थोडी जिद्दीची,
तरी तहान आहे सर्वांना,
हिच्या गोड प्रीतीची,


मिळवून दिले प्रेम दोघांना,
वाट दाखविली त्यांच्या जीवनाला,
अशा करतो यावा राजकुमार,
जो देइल आनंद हिच्या संपूर्ण आयुष्याला
.कवी ---> समीर जोशी
तारीख ---> १६ जानेवारी २०१२/ ९ डिसेंबर २०१३..

Saturday, August 11, 2012

बाप्पा


ही कविता मी लिहिली नाही... परंतु मला ही कविता खूप आवडली म्हणून मी इथे टाकली..

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला ,
दोन क्षण दम खातो म्हणून माझ्याघरी टेकला ,
उंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडला ,
मी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला ,

तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस ?
मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोस ,
मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक,
तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक,

इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो ,
भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो ,
काय करू आता सार मॅनेज होत नाही ,
पुर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाहीत,

इमिग्रेशन च्या रिक्वस्ट्स ने सिस्टीम झालीये हॅंग ,
तरीदेखील संपतच नाही भक्तांची रांग ,
चार आठ आणे मोदक देऊन काय काय मागतात,
माझ्याकडच्या फ़ाइल्स नुसत्या वाढतच जातात,

माझं ऐक तू कर थोडं थोडं डेलिगेशन,
मॅनेजमेंटच्या थेअरीमधे मिळेल सोल्यूशन ,
एम बी ए चे फ़ंडे तू शिकला नाहीस का रे ?
डेलिगेशन ऑफ़ ऍथॉरिटी ऐकल नाहीस कारे ?

असं कर बाप्पा, एक लॅपटॉप घेउन टाक,
तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टीव्हिटी देऊन टाक,
म्हणजे बसल्याजागी काम होइल धावपळ नको,
परत येउन मला दमलो म्हणायला नको,

माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्प झाला खुश,
माग म्हणाला हवं ते, एक वर देतो बक्षिस,
सी ई ओ ची पोझिशन, टाऊनहाऊस ची ओनरशिप,
ईमिग्रेशनदेखील होइल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप.

मी हसलो उगाच, म्हंटल, देशील जे मला हवं .
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं.
'पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं ',
'सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं',
'हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव',
'प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव ',

'देशील आणून परत माझी हरवलेली नाती ',
'नेशील मला परत जिथे आहे माझी माती ',
'इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं ',
'आईबापाचं कधीही न फ़िटणारं देणं ',
'कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर ',
'भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार ',

'य़ंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान',
देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान ?
"तथास्तु" म्हणाला नाही, सोंडेमागून नुसता हसला .
सारं हाताबाहेर गेलंय पोरा, "सुखी रहा" म्हणाला

------------------------------------------------------

अनामिक

Sunday, April 15, 2012

तरीही माझ जीवन सुखाच होत...

ही कविता मी लिहिली नाही... परंतु मला ही कविता खूप आवडली म्हणून मी इथे टाकली..


माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं- आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होत
पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं- घरादाराला कधीही ’लॉक'  नव्हतं..
तरीही माझ जीवन सुखाच होत ||१||

आजोबांच स्थान घरात सर्वोच्च होत- स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होत,
पाहुण्यांचे येणे-जाणे नित्याचेच होत- आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हत..
तरीही माझ जीवन सुखाच होत ||२||

घरासमोर छोटंसं अंगण होत- तुळस, प्राजक्ताला तिथे फुलता येत होत,
दारात रांगोळी काढणे अनिर्वाय होत- विहिरीवरून पाणी भरण कष्टाचं होत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || ३ ||

आंघोळीला लाईफ़बॉय साबण असायचा, माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा,
दात घासायला कडुलिंबाचा फ़ाटा लागायचा- दगडाने अंग घासण फ़ारस सुसह्य नव्हतं
तरीही माझ जीवन सुखाच होत || ४ ॥

पायात चप्पल असण सक्तीच नव्हतं- अंडरपॅट बनियनवर फ़िरण जगन्मान्य होतं
शाळेसाठी मैलभर चालण्याच अप्रूप नव्हतं- मोठ्यांना सायकलशिवाय दुसर वाहन नव्हत..
तरीही माझ जीवन सुखाच होत || ५ ॥

शाळेत गुरुजनांप्रती आदर होता- घोकंपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता,
पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता- छडी हे शिक्षकाचं लाडक शस्त्र होतं..
तरीही माझ जीवन सुखाच होत || ६ ॥

शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता, --नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता,
अंगणात येवून शिकणाराही एक वर्ग होता -  कलांना "भिकेचे डोहाळे" असच नाव होते,
तरीही माझ जीवन सुखाच होत || ७ ॥

नव्या कपड्यांचा लाभ लग्न-मुंजीतच व्हायचा - पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा, 
शाळेचा युनिफोर्म थोरल्याकादूनच मिळायचा - तिन्हीसांजेला घरी परतणे सक्तीच होते,
तरीही माझ जीवन सुखाच होत || ८ || 

वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायाच्या - पोपटांचा थवा झाडावर विसावायचा,
कुत्रा, मांजर, डुकरानी गाव भरलेला असायचा - उंदीर, डास, ढेकुण यांचे सार्वभौम्या राज्य होत..
तरीही माझ जीवन सुखाच होत || ९ ||

पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे - घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे,
उरलेले प्राणी नंतर पेशवेपार्कात भेटायचे - नौनवेज खाण हे तर माहितीच नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १० ||

शाळेत अभ्यासाला खूप महत्व होते- नंबरावर बक्षीस/छड्या यांचे प्रमाण ठरत असत, 
कॉपी, गाईड, क्लासेसना स्थानही नव्हत - वशिल्याने पास होण माहितीच नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || ११ ||

गावची जत्रा  हीच एक करमणूक असायची - चक्र - पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची, 
बुढ्ढीके बाल, गाठीशेवेची तोंडलावणी व्हायची - विमानातला फोटो काढण चमत्कारिक होत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १२ ||

गावाबाहेरच जग हिरवागार असायचं - सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छच असायचे, 
पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं - प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहितीच नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १३ ||
  
हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा - क्रिकेटच्या मैचेस चाळीत व्हायच्या,
बापू नाडकर्णी, चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या -  डे-नाईट, ट्वेंटी- २० चे नावही नव्हते,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १४ ||

प्रवास झालाच तर एस्तीनेच व्हायचा - गचके, ठेचकाळणे याला अंत नसायचा,
होल्डोलसोबत फिरकीचा तांब्याही लागायचा - लक्झरी, फर्स्टक्लास एसीच नावही नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १५ ||

दिवाळी खर्या अर्थाने दिवाळी होती - चमन चिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात होती,
रंगीत तेल, उटणे, मोती साबणाची ऐश होती - लाडू, चकल्या, करंज्या यांचे दर्शन वार्षिकच होत..
तरीही माझ जीवन सुखाच होत || १६ ||

जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायाची - बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची,
रेडीवो सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची - ताई, नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १७ ||

खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा - दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा,
पानात टाकणार्याच्या पाठीत रट्टा बसायचा - हौटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १८ ||

मामाच्या गावाला कधी जाणं-येण होत - धिंगामस्ती करायला नैशनल परमिट होत,
विहिरीत पोहायला तिथेच मिळत होत - भावूबिजेला आईच्या ताटात फारस पडत नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १९ ||

घरातले पुरुष कर्तेसवरते असायचे - बायांना दुपारी झोपणे माहिती नसायचे,
पोराबाळाना गोडधोड सणावारीच मिळायचे - प्रायव्हसीला तिथे काडीचंही स्थान नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || २० ||

पाव्हणे रावळे इ चा घरात राबता असायचा - सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा,
गाववाल्यानाही पंक्तीत सन्मान असायचा - पंक्तीत श्लोक म्हणण मात्र सक्तीच होत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || २१ ||  

आज घराऐवजी लक्झुरीयास फ्लेट आहे - मोपेड, स्कूटर, मोटारचा सूळसुळाट आहे, 
टीव्हीवर शंभर वाहिन्यांचा दनदणात आहे - फास्टफूड, पार्ट्या, ड्रिंक्स याना सन्मान आहे,
कौटुंबिक सुसंवादाची मात्र वानवा आहे || २२ ||

आज मुलांसाठी महागडी शाळा-कॉलेजेस आहेत - दूध, बूस्ट, कोम्प्लैनचा भरपूर मारा आहे,
क्लास, गाईड, कैल्क्यूलेटरची ऐशच ऐश आहे - कपडे, युनिफोर्म. क्रीडासाहित्य हवे तितके आहे,
बालकांच्या नशिबी मात्र  पाळणाघर आहे || २३ ||

आज पतीला ऑफिसात मरेस्तोवर काम आहे - सुशिक्षित पत्नीला करियरचा हव्यास आहे,
एक्स्ट्रा ऐक्तिवितीजना घरात सन्मान आहे - छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहे,
आजीआजोबाना वृद्ध आश्रमाचा रस्ता मोकळा आहे || २४ ||

आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे - मागेल ती वस्तू क्षणात हजार होते आहे,
इन्स्टालमेंट, क्रेडीट कार्डचा सूळसुळाट आहे - सध्या बायवान गेटवनचा जमाना आहे..
म्हणून
पैशावर  समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे, 
पैशावर  समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे.. || २५ ||

कवी ----> अविनाश हळबे, पुणे 

Thursday, December 8, 2011

अश्विनी....


ही कविता मी माझी एक छान मैत्रिण अश्विनीच्या जीवनावरती केली आहे... :) वटवृक्ष उगवला अशोकवनी,
वाढला अपर्णा चरणी,
सावली जिची तेजस्विनी,
कविता केली जिच्यावरी,
ती आहे कोटलग्यांची अश्विनी...

ही मुलगी आहे कष्टाळू,
मन सांभाळणारी मन मिळावू,
स्वताचे मन मारून नेत,
दुसर्यांचे ह्र्दय जिंकणारी,

आई-वडिलांसाठी मुलगा होवू पाहणारी,
त्यांच्या भविष्याची काळजी करणारी,
स्वता:ची स्वप्ने लपवत,
त्यांची स्वप्ने पूर्ण करणारी..

अभिनय तिच्यासाठी महत्वपूर्ण,
गुंतते त्यामधे ती पूर्ण,
तिने कितीही वेळ दिला,
तरी मित्र-मैत्रिणींना तो वाटे अपूर्ण...


-- 
कवी------ समीर जोशी

तारीख---- ०७-१२-२०११


Wednesday, October 20, 2010

तुझीच वाट पहात आहे

ही कविता मी मुक्तपीठ कम्युनिटी वरती दिलेल्या एका ओळीवरती केली आहे... धन्यवाद.....


सोडून गेलीस ज्या वळणावर,
तिथेच मी अजूनी आहे,
मन उदास माझे झाले,
तुझीच वाट पहात आहे...

हे जीवन म्हणजे आता,
कोंडमारा झाला आहे,
पाण्याबाहेरील माश्याप्रमाणे,
जगण्यासाठी तड्फ़ड चालू आहे...

आशा आहे लवकर येशील...
काळे ढग दूर करशील...
निराशलेल्या या मनावर..
आशेची तू ज्योत लावशील...

कवी--------> समीर जोशी...........
तारीख------> २७/०३/२०१०

शीतल ताई

ही कविता मी माझी बहीण शीतलवरती केली आहे...मराठी समूहावरती कविता स्पर्धा घेण्यात आली तेव्हा मी ही कविता केली..

एके दिवशी गुरूवारी,
भेटली सर्वांची काळजी घेणारी,
कोणी दु:खी असेल तर,
त्याच्या चेहर्यावरती हास्य देणारी...
मन म्हणजे मोठे आकाश,
सामील करून घेते ती सगळ्यांना सावकाश,
एकदा सामील झाले मनात,
आनंद मिळतो त्या आकाशात..

ही सगळ्यांची आहे ताई,
मिहिरची ती प्रेमळ आई,
जिथे जिथे ती नजर टाके,
तो परिसर आनंदीत होई,

देत रहा असाच झरा आनंदाचा,
वाळवंटात जसा थेंब पाण्याचा,
सलाम माझा कुलकर्ण्यांच्या अर्धांगिनीला,
कविता अर्पण शीतल कुलकर्णीला..

धन्यवाद

कवी---> समीर जोशी
तारीख---> २०-१०-२०१०

Monday, August 16, 2010

आई

ही कविता मी माझ्या आईवरती केली आहे...ही कविता माझ्या आयुष्यात केलेली पहिली कविता असून, कविता केली तेव्हा मी ५ वी होतो..त्यामुळे कवितेची तारीख आठवत नाही...

माझी आई मनाने सुंदर,
तिच्याबद्दल आहे मला आदर,
सर्वांची राखते ती कदर,
कोणाचा नाही तिला विसर..

सासू-सासरे, पती मुले,
सर्वांसाठी पहाटेच आई फ़ुले,
कोणाच्या मनी काय आहे?
हे तिला आपोआप कळे...

सासूचे ऐकते, पाय चेपते,
सासर्यांना औषधपाणी देते,
पती-मुलांबरोबर, लहान दीर,
सर्वांना बनवते सुंदर खीर..

कवी---> समीर जोशी...

गुणोबा

ही कविता मी माझा एक कॉलेज मित्र गुणेश याच्यावरती गमतीने केली आहे...गुणेश शरीराने जाड होता व सगळे जण त्याला घाबरायचे...पण मी आणि माझा बेस्ट फ़्रेंड किरण त्याला घाबरत नव्हतो..एकदा त्याने आमची खोड काढली..तेव्हा आम्ही ही कविता करून सर्व कॉलेज मधे वाटली..तेव्हापासून तो परत आमच्याशी छान बोलू लागला (खरे तर परत कविता करू नये म्हणून घाबरला होता).....

गुणोबा का निर्माण फ़िर फ़िर,
धरती को आव्हान फ़िर फ़िर,
चल पडा हमारा गुणोबा जहा जहा,
हिल गई धरती वहा वहा...

जिसने मस्तक नही झुकाया,
गुणोबा ने उसको मार गिराया,
क्या खाने मे, क्या पीने मे,
किंचित नही वो मोटा होने मे...

सूरज दमके तो तप जाए,
गुणोबा को देखा तो ढल जाए,
उसके फ़ूक से सब उड जाए,
समुंदर मे गया तो, रेगिस्तान बन जाए...


कवी---> समीर जोशी
तारीख--> १०-०९-२००३

माझे प्रेम

ही कविता मी ०९/०३/२००७ ला केली आहे...

किती वेडे माझे मन,
तुझ्यावरती जडले माझे मन,
आठवण येते प्रत्येक क्षण
प्रेम आहे माझ्यावरती म्हण...

चांगले होते आनंदी,
काय झाले एका-एकी,
एका क्षणात ते उडाले,
आणि तुझ्यापाशी येउन बसले...

विचारायला वाटते भीती,
माझी आहे तुझ्यावरती प्रीती,
सांगू कसे ती किती?
आहेत का कुठल्या रीती?

तुज्याच डोळ्यात माझे जग,
एकदा हो म्हणून बघ,
माझी होवून एकदा जग,
आनंद घेऊ जीवनाचा संग...

तू आहेस चांदणी,
होशील का माझी अर्धांगिणी?
आपण राहू जसे राजा-राणी,
जीवनात काय हवे अजून आणि?

कवी---> समीर जोशी

राजश्री

ही कविता मी राजश्री या मैत्रिणीवरती करायचा प्रयत्न करत होतो..जमलीच नाही..पण जेवढी आली तेवढी लिहून टाकली...

मैत्रिण माझी राजश्री,
ज्यांची आहे महती,
अश्या शिवाजींची चाहती..

निखळ मैत्री आवडते तिला
मैत्रीचा खजिना तिला देवाने दिला,
जॉन आवडतो कधी कधी
पण अक्षय खन्ना जवळचा अगदी,

माधुरी दिक्षीत, आवडते निश्चित,
कुठेही रहा, पण रहा सुरक्षित,
प्रेमाने म्हणतात तिला गुड्डी,
प्रार्थना करतो मैत्री तोडू नको..
जरी तू झालेस बुढ्ढी...


कवी---> समीर जोशी..
तारीख--> १०/०१/२००८

भारतीय क्रिकेट संघ २००७

मी ही कविता भारतीय क्रिकेट संघ जेव्हा २००७ चा विश्वचषक खेळण्यासाठी जाणार होता तेव्हा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ०९ मार्च २००७ रोजी लिहिली होती म्हणून लिहिली होती...

भारतीय क्रिकेट संघ आहे जोरात,
कर्णधार द्रविड जणू आहे भिंत,
एकदा जर आला खेळपट्टीत,
हालत नाही तेथून किंचित...

दुसरा आहे सौरव दादा,
आजकाल सर्व त्याच्यावर फ़िदा,
कमी नाही सचिनसुद्धा,
त्याची बॅट म्हणजे जणू मारूतीची गदा....

कोण म्हणते विरू-पठाण नाही खेळणार?
ते भूमिका बदलून प्रतिस्पर्ध्याला लोळावणार,
सर्वांच्या हातातला करंडक पळविणार,
पंटर-बुकानन बघत राहणार...

आपल्याकडे आहेत भज्जी-कुंबळे,
तसेच आहेत झहीर-मुनाफ़,
जरी हे सर्व असले श्री-शांत,
प्रतिस्पर्धी फ़लंदाज होतील साफ़..

आगरकर, कार्तिक आणि उथप्पा,
सर्व मारतील यांच्याच गप्पा,
आणि असताना आपला धोनी,
भारताला हरवेल काय कोणी?

आपण आहोत सर्व एक,
गुरू आहेत आपले ग्रेग,
बाकी सर्व बनणार मूषक,
भारत जिंकणार विश्वचषक....


कवी----> समीर जोशी...

स्नेहल

नमस्कार ही कविता मी माझी बहिण स्नेहल तोडकर वरती केली आहे...


मी होतो ऑर्कूट्वर,
ऑनलाईन होती स्नेहल तोडकर,
मला वाटले असेल थोडी खोडकर,
बनवेल मला एक जोकर...

गाव तिचे बारामती,
आता राहते तिथे आहे मगरपट्टा सिटी,
तिच्या अल्बममधे आहे बार्बी डॉल,
तिच्यासाठी तो अल्बम म्हणजे आनंदाचा मॉल...

आवाज तिचा इतका छान,
असावा तिच्या घराची शान,
मोबाईल बदलते दिवसाआड,
आईबाबा हिचे खूप करतात लाड...

कविता केली भित भित,
जे सुचले ते लिहित लिहित,
चुकले असेल तर माफ़ कर,
तुझे मन साफ़ कर,
मोठी चूक असेल तर शिक्षा दे,
पण तुझ्या मैत्रीची भिक्षा दे...

कवि-----> समीर जोशी
तारीख---> १५/१२/२००७

Monday, May 17, 2010

सोबत

ही कविता मी माझे आजकालचे मन व्यक्त करण्यासाठी लिहिली आहे...तसेच ही कविता माझ्या मैत्रीवरती केली आहे..यातल्या सर्व भावना या मैत्री या एकाच नजरेने पहाव्यात...

आता असे वाटते

ज्योती सोबत हवी होती...
कारण ती सोबत असताना
आयुष्यात माझ्या फ़ुले होती..

तिने मैत्री तोडली..
ते माझ्या जिव्हारी लागले..
आणि वाट पाहता पाहता...
नजर माझी मरून गेली...

आता एकटाच आहे..
कधी कधी मागे वळून पाहत आहे...
झालेल्या चुकांचा विचार करत आहे...
आणि स्वत:लाच शिक्षा देत आहे...

झालेल्या चुकाने मन तडफडतेय...
कारण खूप वेदना होत असताना...
मला काही होत नाही असे दाखवतेय

एक वेडी आशा आहे...
परत येतील ते दिवस...
म्हणेल ती मला...
चल झालेल्या गोष्टी विसर....

पण ती वेडी आशा आहे..
स्वत:च्याच पायात पाय अडकून पडण्यासारखी..
घोर एक निराशा आहे...

येतेय का ती हे डोळे वाट पाहतील...
शेवट्च्या श्वासापर्यंत ऊघडे राहतील...
येणार नाही ती हे माहीती असून.
मरणानंतरही डोळे तिचा शोध घेत राहतील...

.
कवी---_ समीर जोशी
तारीख---> १७/०५/२०१०

Monday, March 29, 2010

"इतकं काही अवघड नसतं...

ही कविता ज्यांना असे वाटते की जीवन जगणे खूप अवघड आहे त्यांच्यासाठी लिहिली आहे ..... मी स्वत: काही दिवसांपूर्वी या स्थितीतून गेलो होतो... तेव्हा मला मुक्तपीठ समूहातील सदस्यांनी मदत केली...

जेव्हा या ओळीवरती कविता करायची आहे असे वाचले तेव्हा मला आपोआप हे सुचले... काही चुकिचे लिहिले असेल तर क्षमस्व...

जीवन म्हणजे रस्ता आहे...
त्यावरून प्रत्येकाला चालायचे आहे...
थांबायचा विचार करू नका..
कारण थांबणे सोपे आहे..
पण चालणे इतकं अवघड नाही..

वाळूरुपी दु:खे असतील..
हिरवीगार सुखे असतील..
पण या सुखदुखातच तुम्हाला...
तुमची खरी ओळख देतील..

ओळख निर्माण करायची म्हणजे..
थोडे झिजले ही पाहिजे...
काय झाले ठेच लागली म्हणून...
पण एका जागी थांबण्यापेक्षा..
औषध लाऊन चालणे इतक काही अवघड नसते..


कवी------------> समीर जोशी..
तारीख ---------> २९/०३/२०१०

Thursday, October 15, 2009

म्हणूनच कदाचित तुम्हाला वाटते पोरी महागात पडतात ...

ही कविता मी लिहिली नाही पण ही कविता म्हणजे माझ्या ब्लोग वरील खरच सांगतो पोरांनो, पोरी महागात पड्तात या कवीतेला उत्तर म्हणुन "पीयु" नावाच्या मुलीने लिहीली आहे असे माझा मित्र अमोल ने मला सांगितले आहे....आणि मला ते पटले म्हणुन मी ही कविता इथे लावली आहे...

धन्यवाद..................


तू फक्‍त हो म्हण
म्हणून नुसते सता
वतात..
एकदा हो म्हटले की मात्र
सगळीच सूत्रे बदलतात..

जिथे चंद्र दिसायचा केव्हा
तो चेहरा जुना वाटावा लागतो
उगीच मग दुसर्‍यानचा चंद्र
त्याना हवाहावासा वाटतो..

विनाकारण मग मैत्रिणिंची
चौकशी केली जाते..
जरा उलट विचारले तर
उलट प्रश्नाची सरबत्ती सुरू होते..

तिचे डोळे किती छान
आणि तिचे केस किती छान..
आपली गर्लफ्रेंड मात्र
अगदी कस्पटा समान ....

अशीच सगळी गणिते
सर्व मुलीना ठाऊक असतात..
म्हणूनच कदाचित तुम्हाला वाटते
पोरी महागात पडतात ...

धन्यवाद पियु...

Saturday, September 5, 2009

माझी मैत्रिण...

ही कविता देखिल मी माझी मैत्रिण ज्योती वरती केलि आहे...या कविते मधे मी तिच्याबद्दल निरिक्षण केलेले लिहिले आहे...ही कविता मी १५ जून २००७ ला केलि आहे..

माझी मैत्रीण आहे ज्योती,

तिला टेंशन आहे किती?
जरी फ़ोन करावा वाटला ,
तरी मला वाटते भीती...

ती आहे एक परी,
सतत ती अभ्यास करी,
कसे समजावू तिला,
दुनिया आहे किती भारी!!!

करते चिडचिड,
थोडे नखरे,
पण काही झाले,
तरी बोलते खरे,

रतिन तिचा जीवनसाथी,
असावा त्याचा हात,
कायम तिच्या हाती,

जगावे त्यांनी एकमेकांसाठी,
कारण त्यांच्या आहेत,
सात जन्माच्या गाठी,

इतकी माझी मैत्रीण छान,
त्यामुळे ताठ माझी मान,
ही कविता वाचताना,
बघा हसते किती छान....


धन्यवाद......

Monday, August 10, 2009

ज्योती

ही कविता मी माझी बेस्ट फ्रेंड ज्योती वरती केली होती ..तारीख होती...०६ मार्च २००७.......तिच्याबद्दल जे काही वाटते ते सगळे मी या कवितेमधे लिहिले होते...ज्योतीने मला सांगितले होते की तिला ही कविता आवडली म्हणुन....मला मिळाली एक मैत्रिण,
नाव तिचे ज्योती,
मी विचार करतोय,
इतक्या दिवस ती कुठे होती???

आवडत नाही मला जरी,
आनंदात म्हणते ती सॉरी,
कसे सांगू तुला?
तू आहेस किती भारी!!!

मन तुझे आहे साफ़,
करून टाकतेस लगेच माफ़,
जरी आवडतो सलमान खान,
एक रतिन आहे तिची शान!!!

सोमवारी करते उपवास,
नाही तोडला माझा विश्वास,
मैत्रीण आहे माझी खास,
आता खूप झाले बास....


धन्यवाद

Saturday, August 1, 2009

खरच सांगतो पोरांनो,पोरी महागात पडतात

ही कविता मी नाही लिहिली...पण मला खूप आवडली म्हणून मी इथे लावली आहे...

सर्वांनाच पोरी आवडतात ..
जास्त जवळ जाऊ नका
कनाखाली ओढतात
खरच सांगतो पोरंनो,..............

आज हा उदया तो
रोज नवा शोधतात
नुस्तच ठेउन वासावर
खीसा मात्र कापातात
खरच सांगतो पोरंनो,................

हा नडतो,तो भांडतो
दहा जन हनतात
पोरगी राहते बाजूला
पोरच भांडनात पडतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी इकडे,कधी तिकडे
नुस्तच चोरून बघतात
आणि आपण लागलो मागे
कीसॉरी म्हणुन जातात
खरच सांगतो पोरांनो,....................

याला फीरव,त्याला फीरव
दहा लपडयात अडक्तात
कधी धुन्दित,कधी मंदित
नको तस लूडकवतात
खरच सांगतो पोरांनो,...................

कधी सेंट,कधी लिपस्टिक
नुस्तच पावडर थापतात
अन आपण मरला डोळा की
बापाला जाउन सांगतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी सिनेमा,कधी नाटक
नुस्ताच खीसा बघतात
अन खीसा खाली झाला
कीदूसरा बकरा शोधतात
खरच सांगतो पोरांनो,
पोरी महागात पडतात

धन्यवाद......

Monday, July 27, 2009

कवितेची कविता...

ही कविता मी ०८/०३/२००3 या दिवशी केली आहे...


कवितेने सांगितली कविता करायला,

कशी कविता करू??
शब्द सापडेना मला लिहायला,
कोठून करू मी सुरु???

कविता करायला लागते,
शब्दांची संपत्ति,
शब्द सुचेना, काय करू,
आली मोठी आपत्ति...

कविता म्हणाली मला,
काही सांगू नकोस,
दर वेळेस कारणे सांगुन,
तू मला फसवतोस...

आता तुम्हीच सांगा मला,
कसे समजावू कवितेला???
शब्द आठवेना माझ्या मनाला,
आणि सांगते ही मला,
कविता करायला...धन्यवाद...

Tuesday, July 14, 2009

MY SIR........

this poem is on my sir...i wrote this poem on dated 22 January 2006....

He is Engineer by a profession,
He is Millinior by a heart,
He is only teacher I have face,
Who teach me how to win the race....

We are begin with zero,
But he is trying to create hero,
There are lot of human,
But he is the perfect gentleman...

He have a lot of variety,
And this is good for society,
We just passed teen years of life,
And he is the major part of our life....
He have two son and a wife,
We always remeber them in our life,

So what he speak fast,
His mind is very vast,
Do you know who is this after all??
He is Mr. Prasad Vanpal...............thanx all....

Untitled Poem

hi kavita mala 22/01/2001 la suchali..mala ya kavitela naav suchale nahi..konala suchale tr sangawe...aani he mi asech timepass mhanun lihile hote..mala nantr kalale ki hi kavita asu shakte...mi ithe konacha vichar nhi kela ki ti konala aawdel kinwa nahi te.....

This is good rafter,
but what now after,
this is a good chopper,
but where is tall taper,
You are not toper,
but you are a big joker...

This is good flame,
but what is your name,
My name is Sunny,
and I am very funny,

What a beautiful snip,
and also your tip!
you catch my bow,
cause i go to my home now!!

Yes u dont sat other,
coz there is my father,
now i am very angry,
coz i am hungry,

This is good map
but why dog is yap
this is so gap
and your telephone is tap!!!i kno hi kavita howu shakt nahi..kahi pan faltu lihilya sarkhe watate...pan tumhala te tri lihita yete ka yacha vichar karawa.... hahaha..jst kidding..

bye............

Thursday, July 9, 2009

Introduction

Hi Friends...I Open This Blog To Post My Poems..I Know That I Am Not A Biggest Poet....But There Are Some Poems Which I Like To Share With This World...

Thanx And Regards...