Monday, August 16, 2010

भारतीय क्रिकेट संघ २००७

मी ही कविता भारतीय क्रिकेट संघ जेव्हा २००७ चा विश्वचषक खेळण्यासाठी जाणार होता तेव्हा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ०९ मार्च २००७ रोजी लिहिली होती म्हणून लिहिली होती...

भारतीय क्रिकेट संघ आहे जोरात,
कर्णधार द्रविड जणू आहे भिंत,
एकदा जर आला खेळपट्टीत,
हालत नाही तेथून किंचित...

दुसरा आहे सौरव दादा,
आजकाल सर्व त्याच्यावर फ़िदा,
कमी नाही सचिनसुद्धा,
त्याची बॅट म्हणजे जणू मारूतीची गदा....

कोण म्हणते विरू-पठाण नाही खेळणार?
ते भूमिका बदलून प्रतिस्पर्ध्याला लोळावणार,
सर्वांच्या हातातला करंडक पळविणार,
पंटर-बुकानन बघत राहणार...

आपल्याकडे आहेत भज्जी-कुंबळे,
तसेच आहेत झहीर-मुनाफ़,
जरी हे सर्व असले श्री-शांत,
प्रतिस्पर्धी फ़लंदाज होतील साफ़..

आगरकर, कार्तिक आणि उथप्पा,
सर्व मारतील यांच्याच गप्पा,
आणि असताना आपला धोनी,
भारताला हरवेल काय कोणी?

आपण आहोत सर्व एक,
गुरू आहेत आपले ग्रेग,
बाकी सर्व बनणार मूषक,
भारत जिंकणार विश्वचषक....


कवी----> समीर जोशी...

No comments:

Post a Comment