Monday, August 16, 2010

आई

ही कविता मी माझ्या आईवरती केली आहे...ही कविता माझ्या आयुष्यात केलेली पहिली कविता असून, कविता केली तेव्हा मी ५ वी होतो..त्यामुळे कवितेची तारीख आठवत नाही...

माझी आई मनाने सुंदर,
तिच्याबद्दल आहे मला आदर,
सर्वांची राखते ती कदर,
कोणाचा नाही तिला विसर..

सासू-सासरे, पती मुले,
सर्वांसाठी पहाटेच आई फ़ुले,
कोणाच्या मनी काय आहे?
हे तिला आपोआप कळे...

सासूचे ऐकते, पाय चेपते,
सासर्यांना औषधपाणी देते,
पती-मुलांबरोबर, लहान दीर,
सर्वांना बनवते सुंदर खीर..

कवी---> समीर जोशी...

No comments:

Post a Comment