Monday, March 29, 2010

"इतकं काही अवघड नसतं...

ही कविता ज्यांना असे वाटते की जीवन जगणे खूप अवघड आहे त्यांच्यासाठी लिहिली आहे ..... मी स्वत: काही दिवसांपूर्वी या स्थितीतून गेलो होतो... तेव्हा मला मुक्तपीठ समूहातील सदस्यांनी मदत केली...

जेव्हा या ओळीवरती कविता करायची आहे असे वाचले तेव्हा मला आपोआप हे सुचले... काही चुकिचे लिहिले असेल तर क्षमस्व...

जीवन म्हणजे रस्ता आहे...
त्यावरून प्रत्येकाला चालायचे आहे...
थांबायचा विचार करू नका..
कारण थांबणे सोपे आहे..
पण चालणे इतकं अवघड नाही..

वाळूरुपी दु:खे असतील..
हिरवीगार सुखे असतील..
पण या सुखदुखातच तुम्हाला...
तुमची खरी ओळख देतील..

ओळख निर्माण करायची म्हणजे..
थोडे झिजले ही पाहिजे...
काय झाले ठेच लागली म्हणून...
पण एका जागी थांबण्यापेक्षा..
औषध लाऊन चालणे इतक काही अवघड नसते..


कवी------------> समीर जोशी..
तारीख ---------> २९/०३/२०१०

No comments:

Post a Comment