Wednesday, October 20, 2010

शीतल ताई

ही कविता मी माझी बहीण शीतलवरती केली आहे...मराठी समूहावरती कविता स्पर्धा घेण्यात आली तेव्हा मी ही कविता केली..

एके दिवशी गुरूवारी,
भेटली सर्वांची काळजी घेणारी,
कोणी दु:खी असेल तर,
त्याच्या चेहर्यावरती हास्य देणारी...
मन म्हणजे मोठे आकाश,
सामील करून घेते ती सगळ्यांना सावकाश,
एकदा सामील झाले मनात,
आनंद मिळतो त्या आकाशात..

ही सगळ्यांची आहे ताई,
मिहिरची ती प्रेमळ आई,
जिथे जिथे ती नजर टाके,
तो परिसर आनंदीत होई,

देत रहा असाच झरा आनंदाचा,
वाळवंटात जसा थेंब पाण्याचा,
सलाम माझा कुलकर्ण्यांच्या अर्धांगिनीला,
कविता अर्पण शीतल कुलकर्णीला..

धन्यवाद

कवी---> समीर जोशी
तारीख---> २०-१०-२०१०

4 comments: